पुरुषोत्तम नवघरे, वणीः स्माईल फाउंडेशन ही संस्था गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहे. आरोग्य, पर्यावरण आणि शिक्षण या क्षेत्रात या संस्थेचं भरीव कार्य आहे. सोबतच विविध क्षेत्रांतही या संस्थेचं काम मोठं आहे. या सगळ्या कार्याची दखल महसूल प्रशासनानं घेतली. गणराज्यदिनानिमित्त शासकीय मैदानावर आयोजित कार्यक्रमात स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर देविदास जाधव यांचासह त्यांच्या चमूचा उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं. सोबतच पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्यात. स्माईल फाउंडेशनच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.