विवाहित तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, सुतारपुरा हादरला…

हृदयद्रावक - पत्नी गर्भवती असल्याने माहेरी गेली होती, आई पडली एकाकी....

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहारीतल सुतारपुरा येथे एका विवाहित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गणेश विजय राखुंडे (30) असे मृताचे नाव आहे. गणेश हा वणीतील सुतारपुरा – भोईपुरा येथे आई व पत्नीसह राहत होता. तो प्लंबिंगचे काम करीत होता. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते.

सध्या गणेशची पत्नी गर्भवती असल्याने ती माहेरी गेली होती. रात्री नेहमी प्रमाणे गणेश त्याच्या खोलीत झोपायला गेला तर त्याची आई समोरच्या खोलीत झोपून होती. सकाळी 6 वाजताच्या सुमारास गणेशच्या आईचे खोलीत लक्ष गेले असता तिला गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तिने हंबरडा फोडत याची माहिती शेजा-यांना दिली. दरम्यान याची माहिती पोलिसांना देखील देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

सुतारपुरा हादरला
गणेशचे वडील लहाण असतानाच मरण पावले. त्याच्या आईने मजुरी करून तिन मुली आणि गणेशचा सांभाळ केला. गणेश होतकरू होता. तरुण होताच त्याने कुटुंबाची जबाबदारी घेत घरी हातभार लावणे सुरु केले. दोन तीन वर्षाआधी त्याने घर बांधले. गणेश मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचे कुणाशी वैर नव्हते. रात्री त्याने शेजा-यांसह नेहमीसारख्या गप्पा गोष्टी केल्या. गेल्या वर्षीच त्याचे लग्न झाले होते. लवकरच तो बाप बनणार होता. मात्र सकाळी त्याच्या आत्महत्येची वार्ता कळल्याने यावर वार्डातील कुणाचाही विश्वास बसला नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गणेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्याच्या या टोकाच्या कृत्यामुळे त्याची आई एकाकी पडली आहे. या घटनेने सुतारपुरा हादरून गेला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघात – धार्मिक कार्यक्रमातून परतणा-या दुचाकीचा भीषण अपघात

केंद्रशासनाच्या हमी भावानुसार कापूस खरेदी सुरू करा

Comments are closed.