शिवजयंती निमित्त प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे व्याख्यान

शिवतीर्थावर सोमवारी संध्याकाळी 7 वाजता व्याख्यान

बहुगुणी डेस्क, वणी: मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन वणी शहरात करण्यात आले आहे. यानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य आणि संभाजी ब्रिगेड चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजता अभिवादन कार्यक्रम व त्यानंतर 7 वाजता व्याख्यानाला सुरुवात होणार आहे. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, उ‌द्घाटक म्हणून माजी आमदार विश्वास नांदेकार, स्वागताध्यक्ष म्हणून संजय खाडे राहतील.

या जाहीर सभेला नितीनकुमार हिंगोले, गणेश किंद्रे, अजय धोबे, प्रा. बाळकृष्ण राजुरकर, नामदेव जेनेकर, डॉ. शांताराम ठाकरे, संजय निमकर, रमेश येरणे, अनिल हेपट, वंदना आवारी, किरण देरकर, भारती राजपूत, देवराव धांडे, विनोद चोपणे, मंगल तेलंग, विजय नगराळे, रवी चांदणे, डॉ. अविनाश खापणे उपस्थित राहतील. या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवजयंती उत्सव हा समाजातील सर्व जातीधर्माच्या लोकांना व समाजबांधवांना एका समान ध्येयाने प्रेरित करून स्वातंत्र्य, समानता व बंधुभाव निर्माण करणारा आहे. त्यामुळे या उत्सवाचे माध्यमातुन लोकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हावी, या प्रयत्नातून हा सोहळा आयोजित करण्यात आला असून याच जाहीर सभेत शेतमालाला हमीभाव, जातनिहाय जनगणना, सरकारी नोकरभरती तसेच जुनी पेंशन योजना या बाबत ठराव पारीत करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.