पुरुषोत्तम नवघरे, वणी: छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त रविवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शाळा क्रमांक 8 येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सत्या गृप या तर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लाईफ लाईन ब्लड बँक नागपूर यांचे या शिबिराला सहकार्य लाभले. या उपक्रमाला संजय देरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हे शिबिर चालले. याशिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. लाईफ लाईनचे डॉ. अविनाश बभारे, भाग्यश्री लांजेवार, भाग्यश्री खरवडे, वैभव बाराहाते, प्रवीण पायघन या टीमने आपली सेवा दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्या गृपचे अध्यक्ष सतिश तेवर, फैजल बशिर खान, तुलसी तेवर, निखिल येरणे, विक्री कळसकर, सूरज देठे, स्वप्निल आत्राम, अनिकेत कुरेवार, असलान शेख, रौनक तरारे, भूषण सहारे, क्रुष्णा निमसटकर यांनी परिश्रम घेतले.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.