शिवजयंतीला चिमुकल्यांचा 100हून अधिक तुफानी थरार

एकाहून एक सरस शिवकालीन चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्यानिमित्त रंगनाथ स्वामी मंदिराच्या प्रांगणात शिव आनंद व रॉयल फाउंडेशनने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केलीत. जवळपास 100 हून अधिक चिमुकल्यांनी लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी सादर करून उपस्थितांना विस्मयचकित केले. या चमूचे नेतृत्व अवघ्या 10 व्या वर्गातील विद्यार्थिनी व प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे हिने केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयबाबू चोरडिया हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष राकेश खुराणा, वणीचे ठाणेदार अनिल बहेरानी, डॉ. महेंद्र लोढा, पांडुरंग लांजेवार, मुन्नामहाराज तुगनायत, ऍड. नीलेश चौधरी, रोहित वनकर, दादाजी पोटे, राजाभाऊ पाथ्रडकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येकाच्या डोक्यात असावे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

अंगीकृत असलेले हे मर्दानी खेळ पाहता आधुनिकतेकडे वळणारे त्याकडे पाठ फिरवीत हे गुण घ्यायचा प्रयत्न करीत असल्याचे यावेळी आपल्या भाषणातून उपस्थितांनी बोलून दाखविले. गेल्या काही काळात मर्दानी खेळाचे प्रशिक्षण केवळ दहाव्या वर्गात असलेली तेजस्वीनी राजू गव्हाणे देत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.