पुरुषोत्तम नवघरे, वणी: डॉक्टरांची प्रतिष्ठीत संघटना आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वणी शाखेचा कार्यकारिणी पदग्रहण सोहळा झाला. वसंत जिनिंगच्या हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात
विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नागपूर एम्स येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, अमरावती येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. पवन टेकाडे, आयएमए महाराष्ट्र माजी अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ पोटविकार तज्ज्ञ डॉ. मनोज व्यवहारे व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल बेहरानी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रीगिरीवार यांनी अवयवदान याविषयी माहिती दिली. आयएमए वणीला सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले. दुपारी प्रमुख वक्ते डॉ. मनोज व्यवहारे यांनी लिव्हर व पोट विकार
या संदर्भातील उपचार यावर उपस्थित डॉक्टरांना माहिती दिली. त्यानंतर आय.एम.ए.च्या वणी शाखेचा पदग्रहण सोहळा झाला. यात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. शिरीष कुमरवार यांनी अध्यक्ष म्हणून डॉ. शिरीष ठाकरे यांच्याकडून पदभार स्वीकारला.
डॉ. सुनील जुमनाके यांची उपाध्यक्ष, डॉ. संकेत अलोणे सचिव, डॉ. स्वप्रिल गोहोकार सहसचिव, डॉ. विकास हेडाऊ यांची कोषाध्यक्ष, डॉ. संचिता नगराळे यांची महिला विंग सचिव, डॉ. प्रतिक कावडे यांची सांस्कृतिक सचिव तर डॉ. अभीषेक गौरकार यांची क्रीडा सचिव म्हणून निवड करण्यात आली. वणीतील डॉ.
मिलिंद व डॉ. माधुरी तामगाडगे यांची मुलगी डॉ. आकांक्षा मिलिंद तामगाडगे ह्यांची नुकतीच भारतीय पोलीस दलात आएपीयस पदी नियुक्ती झाली. दिल्ली येथे पोलीस कमिश्वर पदावर त्या रुजू आहेत. त्यांच्या या यशाबद्दल आयएमए तर्फे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा सत्कार करण्यात आला. त्यांच्या तर्फे त्यांची आई डॉ. माधुरी तामगाडगे ह्यानी सत्कार स्वीकारला.
संध्याकाळी उपस्थित डॉक्टरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. संचिता नगराळे, डॉ. हुड, डॉ. प्रीती लोढा, डॉ. अलोणे, डॉ. सुनील जुमनाके, डॉ आशुतोष जाधव, वसुधा भोयर यांनी आपली कला सादर केली. मृण्मयी कुमरवार हिने नृत्यकला सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संकेत अलोणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रतिक कावडे यांनी मानले. कार्यक्रमाला आयएमएचे सर्व सदस्य सहपरिवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. महेंद्र लोढा, डॉ. गणेश लिमजे ह्यांनी सहकार्य
केले.
Comments are closed.