छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांसाठी एक लक्षणीय सोहळा

मराठा सेवा संघ आणि कक्ष घेतील विशेष दखल

विवेक तोटेवार, वणी: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या मराठी मातीची ऊर्जा. करोडों आबालवृद्धांचं प्रेरणास्थान. मागील महिन्यात 19 फेब्रुवारीला संपूर्ण विश्वात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. छत्रपती राजे होते. तरीही त्यांचं शासन लोकशाही तत्त्त्वांवर चाललं असल्याचा प्रत्यय येतो. तेआपले राज्य लोकांच्या कल्याणाकरिता समर्पित करतात. ही बाब जगातील संशोधकांना आजही आकर्षित करत आहे. महाराष्ट्रात तर या दिवसाला उत्साहाचे जणू उधाण आलेले असते. शिवजयंती उत्सव आता मनोरंजन, सांस्कृतिक, वैचारिक अशा विविध पद्धतींनी साजरा होते. हा तर आता लोकोत्सवच झाला आहे.

ह्याच शिवजयंती उत्सवाचे ऐतिहासीक महत्त्व लक्षात घेऊन मराठा सेवा संघाच्या वतीने वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यांतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शनिवार दिनांक ९ मार्च रोजी दुपारी २:३० वाजता साधनकरवडीतील कुणबी समाज सांस्कृतिक भवन इथं होईल. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड वणी, मारेगाव, झरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या सत्कार सोहळ्यास साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ येथील नंदकुमार बुटे मार्गदर्शन करतील.

हा शिवजयंती उत्सव वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यात साजरा करणाऱ्या सर्व सार्वजनिक मंडळ/ आयोजकांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहेत.करिता संबंधित शिवजयंती आयोजकांनी दि.५ मार्चपर्यंत आपला संपूर्ण तपशिल अजय धोबे व दत्ता डोहे (वणी तालुका), अनामिक बोढे व लहु जिवतोडे (मारेगाव ) आणि केतन ठाकरे व देव येवले (झरी तालुका) यांचेकडे पाठविण्यात यावा.अशी विनंती मराठा सेवा संघ परिवाराने केली आहे.

Comments are closed.