निधन वार्ता: राम शेवाळकर यांच्या पत्नी विजया शेवाळकर यांचे निधन
संध्याकाळी 5 वा. नागपूर येथील उत्तर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार
पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्राचार्य राम शेवाळकर यांच्या सह धर्मचारिणी विजया शेवाळकर यांचे आज गुरुवारी दिनांक 2 मे रोजी सकाळी सव्वा सातला नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा आशुतोष शेवाळकर, स्नुषा व मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाविषयी साहित्य व सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर नागपूर येथे उत्तर अंबाझरी घाटावर सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
Comments are closed.