घरासमोर ठेवलेल्या दुचारीवर चोरट्यांनी मारला हात

चोरट्यांची दहशत, वणीत दुचाकी चोरीचे सत्र थांबेना

विवेक तोटेवार वणी: विनायक नगर येथून 24 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराजवळ ठेवलेली दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी 29 एप्रिल रोजी गाडी मालकाने तक्रार दिली. शहरातील दुचाकी चोरीचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. सततच्या दुचाकी चोरीने वणीकर त्रस्त झाले आहेत. दुचाकी चोरीमुळे वणीकरांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

Podar School 2025

तक्रारदार नथु राऊत हे वणीतील विनायक नगर येथे राहतात. त्यांना मुलगा अर्पण हा वरोरा येथे नोकरी करतो. तो रोज वणी ते वरोरा त्यांच्या बजाज पल्सर या दुचाकीने (MH 34 BX 5982 किंमत 40 हजार ) अपडाऊन करतो. अर्पण हा 24 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परत आला व त्याने नेहमीप्रमाणे दुचाकी घरासमोर लावली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

 25 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता बघितले असता अर्पणला दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आजूबाजूला विचारपूस केली, परंतु दुचाकी मिळून आली नाही. शेवटी 29 एप्रिल रोजी अर्पणच्या वडिलांनी वणी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.