बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय घोडाम (42) असे मृतकाचे नाव आहे. विजय हा कॉलरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहत होता. तो मिस्त्रीकाम करायचा, सध्या तो राजूर येथील एका चुना भट्ट्यावर काम करायचा. तर त्याची पत्नी देखील मजुरी करायची. आज शनिवारी दिनांक 15 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो घरी आला. त्यावेळी त्याचे मुलं बाहेर खेळत होते तर पत्नी कामावर गेली होती. घरी कुणी नसल्याची संधी साधत विजयने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास जेव्हा मुलं घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुलांनी ही माहिती शेजा-यांना दिली. त्यानंतर याची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला विजयने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र विजयच्या आत्महत्येने त्याचे कुटुंबीय हादरुन गेले आहे. विजयच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 2 मुले असा आप्त परिवार आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.