सविता ठेपाले यांचे अल्पशा आजाराने निधन

आज दु. 12.30 वा. राहत्या घरून अत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: सामाजिक कार्यकर्त्या व काँग्रेसच्या माजी शहराध्यक्ष सविता कुंदनराव ठेपाले यांचे मध्यरात्री निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काल बुधवारी त्यांची अचानक तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असायच्या. काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. आजारी असल्याने काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनात त्यांचा वावर कमी झाला होता. त्यांच्या अकस्मात निधनाने वणीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. आज दुपारी 12.30 वाजता त्यांचे राहते घर भूमीपार्क, एमआयडीसी वणी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Comments are closed.