गर्भवती नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

काही महिन्यांपूर्वीच झाला होता प्रेमविवाह, परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील एका 21 वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. पायल गौरव उरकुडे असे मृत महिलेचे नाव आहे.

Podar School 2025

काही महिन्यांपूर्वी पायलचा गौरव उरकुडे यांच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसांनंतर पायल गरोदर राहिली. ती सात महिन्यांची गरोदर होती. घरी बाळाचे आगमन होणार म्हणून त्यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु होते. सध्या ते भाड्याच्या घरात राहत होते. सोमवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घरी कोणी नसताना पायलने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पायलचे कुटुंबीय घरी आले असताना ही बाब उघडकीस आली. याबाबत तिच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. त्यांनी घराकडे धाव घेतली. याबाबत मुकुटबन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पायलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. पायलच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.