आणखी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

नायगाव शिवारातील मृतदेहाची ओळख पटली, दुस-या मृतदेहाची ओळख अस्पष्ट

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी नायगाव जवळ सुशगंगा कॉलेजच्या जवळ असलेल्या एका शेत शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटली असून हा मृतदेह मुळचा घुग्गुस येथील रहिवासी असलेल्या रणजीत सिंग बहादुर सिंग (38) याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान ही उघना उघडकीस येत नाही तोच आणखी एक घटना समोर आली आहे. झरी तालुक्यातील मांगली शेतशिवारात एका वृद्धाचा मृतदेह आढळला आहे. सदर इसम हा 60 ते 70 वर्षांचा असून उष्माघातामुळे त्यांचा बळी गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सदर मृतदेह हा अनोळखी असून या प्रकरणी मुकुटबन पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन ठाणेदारांनी केले आहे.

एका मृतदेहाची ओळख पटली
नायगाव शेतशिवारात आढळलेला मृतदेह हा मुळचा घुग्गुस येथील रहिवासी असलेल्या रणजीत सिंग बहादूर सिंग याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो आपल्या नातेवाईकांसोबत वरोरा येथे राहत होता. तो कलर पेंटिंग व रोज मजुरीचे काम करायचा. तो वणीला कशासाठी आला होता, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मृतदेह आढळल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर रणजीतच्या नातेवाईकांनी सदर मृतदेह हा रणजीतचा असल्याची माहिती दिली. त्याच्या पश्चात आई, वडील व एक भाऊ असल्याची माहिती आहे. रणजीतचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मांगली येथे आढळला मृतदेह
झरी तालुक्यातील मांगली शिवारात रविवारी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. मृत इसमाचे वय अंदाजे 60 ते 70 आहे. घटना उघडकीस येताच मुकुटबन पोलीस घटनास्थळी गेले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. या इसमाचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतदेह कुणाच्या ओळखीचा असल्यास मुकुटबन पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा 8975173354 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रविवारी गाठणार तापमानाचा उच्चांक, 47 डीग्री तापमानाचा अंदाज

Comments are closed.