जिनिंगच्या व्यापा-यांकडून शेतकऱ्यांची लूट

0

रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथे साई, बालाजी व नगरवाला जिनिंग तर्फे वणी मध्ये निघालेल्या भावापेक्षा पाचशे ते एक हजार रुपये कमी दराने खरेदी करुन शेतकऱ्यांची सर्रास लुटमार सुरु आहे. ह्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी व सचिवाने लक्ष देणे गरजेचे आहे.

दिवाळी नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे कापूस खरेदी केन्द्राचा २५ आक्टोबरला मुहुर्त झाला होता. त्यावेळेस व्यापाऱ्यांनी सांगितले होते की शेतकर्यांनी मुकूटबन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेला वजन काटा मानण्यात येईल. वणी येथील निघालेल्या हर्रास भावापेक्षा ५० रुपये कमीने व कापसाला 8-10 टक्के (ओलावा) माईश्चर सुट देण्यात येईल. परंतु व्यापारी ह्या आश्वासनाची पुर्तता न करता सर्रास कमी भावाने खरेदी करतात व काट्यामध्ये सुध्दा २० ते २५ किलोची तफावत आहे.

मंगळवार (ता. ३०) ला वणी येथे ४७५० भाव निघाला होता. त्यानुसार मुकूटबनला कापसाचा ४ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव द्यायला पाहीजे होता. परंतु वामनरेड्डी गड्ड्मवार रा. लिंगटी यांनी श्री बालाजी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी मध्ये शेतमाल विक्री पावती क्रमांक २४८८ वाहन क्रमांक एम एच-२९-६७४० चा काटा करुन १६ क्वींटल ६५ किलो कापसाला प्रत्ती क्विंटल ३८५० भाव देण्यात आला. म्हणजेच वणी च्या भावापेक्षा ८५० रुपये कमी लावण्यात आले. भावाबद्दल वामन यानी हुज्जत केली असता व्यापारी म्हणाले की पटत असेल तर कापूस द्या अन्यथा परत न्या. असे सांगुन हा भाव मला मान्य आहे असे म्हणून छापील फार्मवर दलालाची व वामनरेड्डीची सही घेतली.

अशा ह्या कापूस व्यापार्यांच्या लुटमारीने शेतकरी त्रस्त झाला असुन ह्यावर्षी बोंडअळीने उत्पन्नात पन्नास टक्क्यापेक्षा कमी उत्पन्न झालेले आहे. शेतमालाला लागणारा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांचा कापुस खराब असल्याचं कारण समोर करीत गरीब शेतकऱ्यांचे पांढरे सोने कवडी मोल भावाने खरेदी करीत आहे. संचालक मंडळ व सचिव यांनी या लुटीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

कापूस खरेदी केन्द्राचा मुहुर्त झाला होता. त्यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानी व्यापाऱ्यांना सांगितले होते की मुकूटबन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केलेला वजन काटा मान्य करावा. वणी येथील निघालेल्या हर्रास भावापेक्षा ५० रुपये कमीने व कापसाला 8-10 टक्के (ओलावा) माउश्चर सुट द्यावी. ह्या अटी व्यापाऱ्यांनी मान्य केल्या होत्या. संचालकानी शेतकर्याना नाश्ता व चहा विनामुल्य देण्यात येईल वजन काटा विना शुल्क करण्यात येईल. परंतु कोणताही शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आपल्या कापसाच्या बैलगाड्या व वाहने आणत नसुन परस्पर जिनींग मध्ये नेतात. – संदीप बुर्रेवार, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती झरी/मुकूटबन

Leave A Reply

Your email address will not be published.