सोमवारी छत्रपतींचा पोवाडा, शिवगर्जना, देखाव्यांनी दणाणणार शहर

सोमवारी मनसे साजरा करणार तिथीनुसार शिवजयंती सोहळा

हुगुणी डेस्क, वणी: अखिल विश्वाचं प्रेरणास्थान म्हणजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची दरवर्षी तिथीनुसार जयंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होतो. याही वर्षी पक्षनेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यानिमनित्त विविध कार्यक्रम होत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. फटाक्यांची अतषबाजी हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. ताशांचा गजर, नृत्य, झांजांचा निनाद, आकर्षक देखावा आणि लेझीम पथकाच्या दणदणीत सलामीत हो सोहळा होईल. सोमवार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता होईल.

मागील वर्षी तुळजा भवानी मातेचा भव्य दिव्य देखावा, शिवरायांचा महाअभिषेक, ढोल ताशा पथकांचे वादन झाले होते. हीच परंपरा कायम ठेवत याही वर्षी शिवजयंती सोहळ्यानिमित्त वणी परिसर भगवामय करण्याचा मनसेचा संकल्प आहे. चौकाचौकांत भगव्या कमानी, झेंडे आणि शिवाजी महाराजांचे वर्णन करणाऱ्या पोवाड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण करण्यात येईल.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणीत पारंपरिक प्रथेनुसार शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ सकाळी ०७.०० वाजता पुतळ्यास महाअभिषेक करून करण्यात येईल. त्यानंतर याठिकाणी अनेक शिवभक्तांकडून छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होण्याची विनंती पक्षनेते राजू उंबरकर यांनी केली आहे.

 

Comments are closed.