बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील कब्रस्थानमध्ये एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. तर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मंदर येथील शेतशिवारात एका इसमाचा मृतदेह आढळला. कब्रस्थान येथील मृतकाचे नाव जावेद शाह अहेमद शाह असे असून तो अंदाजे 38 वर्षांचा होता. तो शास्त्रीनगर येथे कुटुंबीयांसह राहत होता. बुधवारी दिनांक 30 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जावेद हा पेपर वितरणाचे काम करत होता. मृदू स्वभावी असलेल्या जावेदने आत्महत्या का केली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. घटनेची माहीत मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. जावेद यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहेत. घरचा कर्त्या पुरुषाने असे टोकाचे पाऊल उचलल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मंदर येथे आढळला मृतदेह
दुसरी घटना ही मंदर येथील आहे. गावालगतच्या शेतशिवारात गावातीलच रहिवासी असलेले बाळकृष्ण उर्फ बाळू रामचंद्र येवले वय अंदाजे 55 यांचा मृतदेह आढळला. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटना उघडकीस येताच गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यांचा उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जात आहे. घटनेचा तपास पोलीस करीत आहे.
आनंदाची बातमी – बालविद्या मंदिर शाळेत आता पहिलीपासून CBSE पॅटर्न, प्रवेश सुरु…
Comments are closed.