बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकल व ट्रकची समोरा समोर धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मंगळवारी दिनांक 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास वागद-याजवळ हा अपघात झाला. दशरथ राजकुमार मालेकर (32) असे जखमीचे नाव आहे. तो कोरपना तालुक्यातील हेटी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास दशरथ हा घुग्घुस मार्गाहून त्याची दुचाकीने (MH29 W4432) राँग साईडने वणीच्या दिशेने येत होता. त्याच वेळी वणीहून चारगाव चौकीकडे एक कोळसा वाहतूक करणारा ट्रक (MH34 BZ3747) जात होता. वागद-याजवळ समोरून ट्रक येताना दिसताच दशरथचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व त्याची दुचाकी ट्रकच्या उजव्या बाजूला आदळली. ही धडक इतकी जबर होती की यात ट्रकचे बम्पर तुटले.
या धडकेत दुचाकीचे चाक ट्रकच्या समोरील चाकात गेले. त्यामुळे दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच जवळपासच्या लोकांनी धाव घेतली. नागरिकांनी तात्काळ ऍम्बुलन्स बोलावली. दशरथला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
आनंदाची बातमी – बालविद्या मंदिर शाळेत आता पहिलीपासून CBSE पॅटर्न, प्रवेश सुरु…



Comments are closed.