लायन्स हायस्कूलच्या तब्बल २३ विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

इयत्ता पाचवी आणि आठवीचे विक्रमी विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी झालेत पात्र

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे द्वारा नुकतीच शिष्यवृत्ती परीक्षा झाली. त्यात वणी लायन्स हायस्कूलच्या तब्बल 23 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या या परीक्षेत इयत्ता पाचवीचे 14 तर इयत्ता आठवीचे 9 असे एकुण 23 वि‌द्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आध्या देवगडे, आराध्य गोहोकार, आरोही खैरे, हेमाश्री कोटरंगे, इंद्रायणी सिंग्रुप, मृणाली गोवरदीपे, पार्थ निमसटकर, राणी भालेराव, सौम्या आवारी, सावरी थोरात, श्रुत वाघ, स्मिरल डहाके, तेजस चिकटे, तेजेश्वर खुसपुरे, अनुश्री खिरेकर, अस्मि विकटे, मदिहा शेख, निधी चैदे, पूर्वी साळुंके, राधा कुल्दीवार, सेहर शेख, त्रिशा दुमणे हे ते यशस्वी विद्यार्थी आहेत. या घवघवीत यशाचे कौतुक वि‌द्यालयाचे अध्यक्ष संजीवरेड्‌डी बोद‌कुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, वि‌द्यालयाचे सचिव सुधीर दामले, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पायडकर, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा विवेक देशपांडे यांनी केले आहे. विद्यार्थी आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, शिक्षक व प्राचार्या चित्रा देशपांडे यांना देत आहेत. या यशासाठी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.