रितिकने मारली फाईट, दुकानचालकावर दगडाने हल्ला

ग्रामीण रुग्णालयासमोरील घटना, आरोपीवर गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: दुकान चालकाला एकाने दगडाने मारहाण केली. शनिवारी दिनांक 3 मे रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गणेश देविदास रायपुरे असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश दामले फैल येथील रहिवासी असून त्याचे ग्रामीण रुग्णालयासमोरील कब्रस्थान कमिटीच्या संकुलात एक ब्लॉक आहे. यात तो पानटपरी चालवतो. दुपारी तो नेहमी प्रमाणे दुकानात होता. दरम्यान तिथे आरोपी रितीक उर्फ डंबु संजय रायपुरे (23) रा. दामले फैल वणी हा आला. त्याने गणेशला तुझा भाऊ दिनेश कुठे आहे अशी विचारणा केली. यावर गणेशने काय झाले असे विचारले असता रितिक चिडला. त्याने बाजूला असलेला दगड उचलला व गणेशच्या डोक्यावर मारला. या मारहाणीत त्याचे डोके फुटले. त्यानंतर रितिक शिविगाळ करीत व जिवे मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेला. गणेशने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी रितिक विरोधात बीएनएसच्या कलम 118(1),352,351(2)(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Comments are closed.