उच्चशिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एका इंजिनियर मुलीने का निवडला आत्महत्येचा पर्याय?

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कु. दीक्षा केशव उमरे (27) असे मृत तरुणीचे नाव आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने मारेगावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, कु. दीक्षा केशव उमरे ही मारेगाव येथील वार्ड क्रमांक 16 येथील रहिवासी होती. तिचे वडील आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. दीक्षाने इंजिनियरिंग पूर्ण केले होते. त्यानंतर ती छ. संभाजीनगर येथील एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करीत होती. सध्या तिच्या लग्नाची बोलणी चालत असल्याने ती सुटी घेऊन मारेगाव येथे आली होती. बुधवारी दिनांक 7 मे रोजी रात्री ती तिच्या हॉलमध्ये झोपली होती. हॉलमध्येच तिचे आईवडील देखील झोपले होते. मात्र आईवडिल झोपल्यानंतर ती बेडरुममध्ये गेले. तिथे तिने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास  घेतला.  

आज गुरुवारी दिनांक 8 मे रोजी सकाळी तिचे आईवडील उठले. मात्र त्यांना दीक्षा दिसली नाही. ते घरातील बेडरुममध्ये गेले. बेडरुम आतून लॉक होता. तिच्या पालकांनी तिला आवाज दिल्यावरील तिने कोणताही प्रतिसाद दिला नाही. दार ठोकल्यानंतरही तिचा कोणताही प्रतिसाद न आल्याने तिच्या आईवडिलांना शंका आली. त्यांनी दरवाजा तोडला असता त्यांना तिने गळफास घेतल्याचे उघडकीस आले.

घटना उघडकीस येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व तिचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. दीक्षाच्या पश्चात तिची आई, सेवानिवृत्त वडील, बहिण असा मोठा आत्पपरिवार आहे. या घटनेमुळे मारेगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
दीक्षाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या दीक्षाच्या लग्नाची बोलणी सुरु होती. काही दिवसांआधी दीक्षाचे लग्न जुळले होते. मात्र काही कारणास्तव हे लग्न मोडले होते, त्यामुळे ती तणावात होती, अशी माहिती आहे. या कारणाने तर तिने आत्महत्या केली नसावी असा अंदाज सध्या परिसरात बांधला जात आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडिता गर्भवती असल्याने घटना उघडकीस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.