टोलनानाक्याजवळ दुचाकीचा अपघात, व्यसनमुक्ती चालकाचा मृत्यू

शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला अपघात. परिसरात शोककळा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्गुस र्गावरील टोलनानाक्याजवळ एका दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी दिनांक 10 मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा अपघत झाला. नकुल अरुण रहांगडाले (34) से मृत तरुणाचे नाव आहे. तो लालगुडा येथे व्यसनमुक्ती केंट चालवत होता. 

मृत नकुल हे मु़ळचे चंद्रपूर येथील रहिवासी होते. त्यांनी लालगुडा येथील पटवारी कॉलोनीत व्यसनमुक्ती केंद्र टाकले होते. तसेच ते पटवारी कॉलोनी येथे त्यांच्या कुटुंबियांसह राहायचे. शनिवारी ते कामानिमित्त दुचाकीने बाहेर गेले होते. रात्री 9 वाजताच्या दरम्यान ते घरी परतत होते. दरम्यान टोल नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या एक जिनिंग जवळ त्यांचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

त्यांची दुचाकी डिव्हायडरवर आदळली. या अपघातात नकुलच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तात्काळ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. चंद्रपूर येथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

मृतक नकुल हा विवाहित असून त्याला 3 वर्षाची एक मुलगी आहे. त्याचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नकुलच्या व्यसनमुक्ती केंद्रात परिसरातील अनेक लोक व्यसनमुक्त होऊन आलेत. नकुलच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Comments are closed.