बहुगुणी डेस्क, वणी: वणीत एका खासगी ठिकाणी काम करणाऱ्या एका कुमारीकेला अज्ञात इसमाने पळवून नेले. शनिवारी दिनांक 10 मे रोजी सकाळी ही घटना घडली. कुणीतरी मुली पळवून नेले या संशयातून मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुलगी घरून निघताना सोबत मेकअप किट घेऊन गेली.
फिर्यादी महिला ही वणीतील एका भागात राहत असून ती मदतनीस म्हणून काम करते. त्यांना दोन मुली असून यातील पीडित मुलगी ही 17 वर्ष 5 महिन्याची आहे. ती वणीतील एका खासगी ठिकाणी मजुरीचे काम करते. ती नेहमी कामाला स. 11 वाजता जाते व रात्री 9 वाजता घरी परत येते. शनिवारी सकाळी पीडितेची आई घरकामाला गेली होती.
सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ती घरी आली. मात्र तिला तिची मुलगी दिसली नाही. तिने दुस-या मुलीला विचारणा केली तर तिने एक तासाआधीच बहिण घरून निघाली. ती तयारी करून गेली व सोबत स्कूल बॅग आणि मेकअपची कीटही नेली अशी माहिती तिने दिली. मुलीच्या आईने शेजारी, नातेवाईक व मुलीच्या कामाच्या ठिकाणी विचारणा केली. मात्र त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही.
अखेर मुलीला कुणीतर फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. मुलीच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 137 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.



Comments are closed.