विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद कार्यालय परिसर, भाजीबाजार हा अत्यंत वर्दळीचा भाग. मात्र सोमवार दिनांक 12 मे रोजी वणी शहराच्या मध्यभागी ज्योती बार समोर अगदी रस्त्यावर शहरातील एका व्यक्तीने बोअरवे खोदून शासकीय नियमांना धाब्यावर बसवले. या व्यक्तीवर आता कोणती कारवाई होईल याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. शहराच्या मध्यभागी बाजारपेठेत अगदी वर्दळीच्या रस्त्यावर एका व्यक्तीने चक्क रस्ता फोडून रस्त्याच्या मध्यभागी बोअरवेल मारला आहे. या घटनेकडे पाहून नियम व कायदे कायदे हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे..या ठिकाणी त्या इसमाची जागा आहे. त्याने त्याच्या जागेवर बोअरवेल न मारता चक्क अगदी रस्त्याच्या मध्यभागी बोअरवेल मारला आहे. सोमवार दिनांक 12 मे रोजी बुद्धजयंती निमित्त शासकीय सुट्टी असल्याने त्याने सकाळी बोअरवेलचे काम सुरू केले. सायंकाळी पूर्ण केले आहे. असे कुणालाही शासकीय जागेवर अगदी रस्त्यावर रस्ता फोडून बोअरवेल मारण्याची परवानगी आहे काय? या इसमावर आता नगर परिषद प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्व वणीकरांचे लक्ष लागले आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.

Comments are closed.