घ्यायला गेलेत भाजीपाला, अन् चोरट्याचा बाईकवरच घाला

शहरातील भाजीबाजारातून शेतकऱ्याची टू-व्हीलर लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस बाईकचोर शहरात धुमाकूळ घालत आहेत. घराजवळ तर सोडाच घरात लावलेल्याही गाड्या गायब झाल्यात. त्यात पुन्हा बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगावच्या एका शेतकऱ्याची टू-व्हीलर चोरट्यानं गायब केली. मधुकर वासुदेव पिंपळकर (52) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मधुकर पिंपळकर यांच्याकडे स्प्लेंडर प्लस ही हिरो कंपनीची MH 29-W-5155 क्रमांकाची व काळे-निळे पट्टे असलेली टू-व्हीलर होती. काही वर्षांपूर्वी त्यांनी ती 18/5/2009 ला घेतली होती. तेव्हापासून ते तिला दैनंदिन कामांकरिता वापरत होते. वणीलाही ते याच गाडीनं यायचे. असेच ते बुधवारी सायंकाळी दहेगावच्या एका सोबत्यासोबत वणीच्या भाजी मंडीत आलेत. त्यांना तिथं खाजगी काम होतं. म्हणून त्यांनी आपली टू-व्हीलर नगर परीषद गेटच्या बाहेर रोडवर ठेवली.

नंतर ते तिथून भाजीपाला खरेदी करण्याकरिता गेलेत. सर्व खरेदी झाल्यानंतर ते काही वेळांतच भाजीपाला घेऊन नगर परीषदजवळ आलेत. तर तिथं आल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांची बाईक लावलेल्या जागेवर दिसलीच नाही. मग त्यांनी आजुबाजूला गाडीची विचारपूस. तिथं गाडीची काहीच माहिती मिळाली नाही. नंतर त्यांनी गावात गाडीचा शोध घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांची वापरातली अंदाजे 30,000 रूपये किंमतीची मोटर सायकल कोणीतरी चोरून नेली.

गाडीचे कागदपत्र मिळत नसल्याने मग त्यांनी वणी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. 2023 कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.