सहयोग मल्टिस्टेट पतसंस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना बॅग वाटप
कोथुर्ला जिल्हा परिषद शाळेत उपक्रमाचे आयोजन
बहुगुणी डेस्क, वणी: सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी आणि उडान वुमन फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटपाचा उपक्रम राबवला. रविवारी दि. 27 जुलै रोजी कोथुर्ला जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सहयोग ग्रुपचे एम.डी. जयेश रामादे व सहयोग हॉस्पिटल तथा उडानच्या एम.डी शीतल रामादे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राज्यातील विविध शाखांमध्ये राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत सहयोग उडान फाउंडेशनमार्फत वृक्षारोपण, कपडे-साहित्य वाटप, अनाथ मुलांचे पालकत्व, महिला सशक्तीकरणाचे उपक्रम राबवले जातात. कोथुर्ला शाळेतील वाटपात विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले. शाखा व्यवस्थापक अन्सार बेग, उप व्यवस्थापक नागेश रायपुरे, सारिका दीक्षित, उज्वला चंदनखेडे, विजया कांबळे, आचल मिलमिले, मुख्याध्यापक सिध्दार्थ ढवळे, ऋषभ देशपांडे, भाग्यश्री ढाकणे, किशोर आसुटकर उपस्थित होते.
उडान वुमन फाउंडेशन वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना कपडे-साहित्य वाटप, अनाथ मुलांना शिक्षण, महिला सशक्तीकरणाचे उपक्रम राबवते. महिला उधमी सशक्तीकरण योजनेत स्विस कर्ज, बचत गटातून आत्मनिर्भरता प्रोत्साहन दिले जाते. सहयोग ग्रुपला पृथ्वी पुरस्कार, सशस्त्र दूरस्थक्षेत्र पुरस्कार, सह्याद्री अर्थरत्न, सुषमा स्वराज, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट, बहुजन एकता संघर्ष आदी पुरस्कार मिळाले.
सहयोग ग्रुप बँकिंग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या 15 शाखा जिल्ह्यात, 200 पेक्षा जास्त राज्यात, आणि 7 राज्यांत कार्यरत आहेत. बचत खाते, चालू खाते, दैनिक जमा, सावधि जमा, मासिक आय योजना, दाम दुप्पट, मासिक आवर्ती जमा, स्विस कर्ज, दुचाकी कर्ज आदी योजनांचे व्याज इतर बँकांपेक्षा जास्त आहे. वैद्यकीय क्षेत्रात गोंदिया, बालाघाट, हरियाणातील NABH प्रमाणित रुग्णालये चालवली जातात. नागपूर, चंद्रपूर, रायपूर येथे लवकरच नवीन रुग्णालये सुरू होणार आहेत.



Comments are closed.