उघड्यावर व्यवसाय करणाऱ्यांना युवासेनेतर्फे छत्री वाटप

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

विवेक तोटेवार, वणी: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 27 जुलै रोजी वणी शहरात उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना छत्री वाटप करण्यात आले. युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवला गेला. या उपक्रमांतर्गत रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना, महिलांना, शेतकऱ्यांना, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांना, विद्यार्थ्यांना, छोट्या दुकानदारांना, दिव्यांग व्यक्तींना आणि वयोवृद्धांना छत्री वितरित करण्यात आल्या. पावसाळ्यात उघड्यावर काम करणाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. 

महिला शेतकऱ्यांपासून फेरीवाल्यांपर्यंत आणि हातगाडीवर फळे-भाजी विकणाऱ्यांपर्यंत पावसात अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांच्या दैनंदिन कामाला थोडी मदत व्हावी, यासाठी शिवसेनेने हा उपक्रम राबवला. कार्यक्रमात नितीन शिरभाते, सुरेश शेंडे, कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, विनोद दुमने, राजू पाटील, राजू गोलाईत, संजोग झाडे, राजू मेश्राम, निलेश सूर्तीकर, संघर्ष शेंडे, कुणाल खामणकर, गौरव पांडे, निखिल मडावी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिवसेना ही जनतेशी जोडलेली संघटना असून, समाजोपयोगी उपक्रम ही आमची ओळख आहे. भविष्यातही असे उपक्रम राबवले जातील, असे आश्वासन अजिंक्य शेंडे यांनी दिले. सहभागी नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

Comments are closed.