रस्त्यासाठी काँग्रेस आक्रमक, डबक्यात बसून अर्धनग्न आंदोलन

मारेगाव ते मार्डी व इतर रस्त्यासाठी काँग्रेसचे धडाकेबाज आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने कायम याकडे दुर्लक्ष करीत निवेदनाला केराची टोपली दाखवली. अखेर याविरोधात मारेगाव काँग्रेसतर्फे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 28 जुलै रोजी दुपारी 11 वाजता मारेगाव ते भालेवाडी या ठिकाणी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे मारेगाव तालुका अध्यक्ष मारुती गौरकार, आकाश बदकी व अंकुश माफूर यांनी रस्त्यावरील डबक्यात अर्धनग्न बसून आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनात नरेंद्र ठाकरे, अरुणा खंडाळकर, संजय खाडे, गौरीशंकर खुराना यांची प्रमुख उपस्थिती होती.

मारेगाव तालुक्यात रस्ते ठिकठिकाणी उखडलेले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे नेहमीच अपघाताची मालिका सुरु आहे. मारेगाव ते मार्डी हा 11 किलोमीटरचा रस्ता, चोपन ते चनोडा, मार्डी ते हिवरा, मार्डी ते कुंभा फाटा, करणवाडी ते गोधणी मार्गे बोर्डा, मांगरुळ ते वेगाव, गौराळा HC ते वनोजादेवी यासह तालुक्यातील अनेक रस्ते उखडलेले आहे. अनेक रस्त्याचे काम मंजूर झाले आहेत. मात्र त्याचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. त्यामुळे अखेर सोमवारी अर्धनग्न आंदोलन करून काँग्रेसतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला.

मारेगाव ते मार्डी हा रहदारीचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग ठिकठिकाणी उखडला आहे. या रोडचे काम मजूर झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाचे लोकप्रतिनिंनी उद्घाटन देखील केले. मात्र अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. या उलट रस्ताच्या आजुबाजुची माती खोदून सायडींग भरण्याचे काम केले. तसेच रस्त्यावर गिट्टी टाकल्युने वाहने स्लिप होऊन या ठिकाणी अनेक अपघात होत आहे. अखेर काँग्रेसने आंदोलनाचे हत्यार उपसले. आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. तसेच प्रशासनाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आंदोलनात युनुस शेख, यादवराव काळे, रवींद्र धानोरकर, वसंतराव आसुटकर, गजानन खापणे, मारोती सोमलकर, बबलू कुरेशी, बालूभाऊ चौधरी, जयसिंग गोहोकार, शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, तेजराज बोढे, समीर सय्यद, गौरव आसेकर, प्रफुल्ल विखणकर, निलेश रस्से, भूषण कोल्हे, हनुमान जुमनाके, सतीश कलेवार, अशोक सुडीत, संतोष आत्राम, रामभाऊ खळसे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला. रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष मारोती गौरकार यांनी दिला.

Comments are closed.