संस्कृत सप्ताह निमित्त नि:शुल्क ऑनलाईन वर्कशॉप

लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग व संस्कृत भारतीचा उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग आणि संस्कृत भारती शाखा वणी यांच्या संयुक्त विद्यमाने 6 ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत संस्कृत सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत “श्री रामायण प्रश्नावली” हे ऑनलाइन आणि नि:शुल्क वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://chat.whatsapp.com/Ki7amzkr2vd8RuaUFyRPq1?mode=ac_t या लिंकद्वारे WhatsApp समूहात प्रवेश घ्यावा लागणार आहे. हा उपक्रम महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि वणी परिसरातील संस्कृत प्रेमींसाठी मर्यादित असल्याने, कृपया ही लिंक बाहेरगावी कोणालाही पाठवू नये. वणी परिसरातील जास्तीत जास्त संस्कृत प्रेमींना सहभागी करून घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या उपक्रमाशी संबंधित सर्व सूचना आणि माहिती लवकरच WhatsApp समूहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.