बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील प्रगती नगर येथील एका वकिलाच्या घरातून मोबाइल चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्याचा पाठलाग करण्यात आला. मात्र चोरटा पळण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुकुंद मधुकर एकरे (54) हे प्रगतीनगर येथील रहिवासी असून ते वकील आहेत. शुक्रवारी रात्री त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते दार उघडे ठेवून झोपले होते. दरम्यान त्यांनी त्यांचा मोबाईल भिंतीतील कडप्यात चार्जिंगसाठी लावला होता. रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास त्यांना काही हालचाल जाणवली त्यामुले ते झोपेतून उठले. दरम्यान त्यांना एक तरुण फिकट निळ्या टी-शर्ट आणि काळ्या बरमुडा घातलेल्या अवस्थेत मोबाइल घेऊन पळताना पाहिले. त्यांनी चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पळून गेला.
त्यांनी आजूबाजूच्या परिसरात तरुणाचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. मुकुंद यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 303(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments are closed.