बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील चिखलगाव रोड येथील देवानंद तेलंग यांचे मंगळवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले. ते 65 वर्षांचे होते. हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री 11 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देवानंद तेलंग हे वेकोलिचे सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतही हिरारीने सहभागी व्हायचे. आंबेडकरी चळवळीतील ते एक सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी वणीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अंत्ययात्रा दु. 1 वाजता चिखलगाव रोड येथील राहत्या घरून निघणार आहे. आर्टिस्ट व आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्त कृपाशील तेलंग व सुप्रसिद्ध महिला डीजे जेनी यांचे ते वडील आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, मित्रपरिवार असा मोठा आप्त परिवार आहे. वणी बहुगुणीतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Comments are closed.