शिरपूर पोलिसांच्या ताब्यातून फरार आरोपीला अटक

एलसीबी पथकाने वणी येथून केली अटक

0

जितेंद्र कोठारी (विशेष प्रतिनिधी) वणी: भंगार चोरी प्रकरणात अटक आरोपी दिनांक 20 मार्च रोजी फरार झाला होता. आरोपीला यवतमाळ जिल्हा कारागृहात नेत असताना करंजीला शिरपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी अभय पचारे पसार झाला होता. अखेर आज बुधवारी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने जिल्हा परिषद कॉलनी वणी येथून आरोपीला अटक करून पांढरकवडा पोलिसांच्या ताब्यात दिले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपीचे साथीदार मारेगाव पो.स्टे. अंतर्गत कलम 379 अन्वये गुन्हा मधील फरार असलेले इतर तीन आरोपी शंकर ज्योतिराम कनाके, राम दशरथ देठे व सैय्यद सदाम सैयद उस्मान सर्व रा. रंगनाथ नगर वणी यांना रंगनाथ नगर वणी येथून अटक करून मारेगाव पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.

वरील आरोपी विरुद पो. स्टे. पांढरकवडा, शिरपूर, राळेगाव व पारवा येथे चोरीचे गुन्हे दाखल आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक , यवतमाळ, अपर पो.अधीक्षक व स्थानिक गुन्हा शाखा प्रमुख पो.नि. मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन पतंगे, सहायक फौजदार भीमराव शिरसाट, पोना गजानन डोंगरे, चालक सुरेंद्र वाकोडे यांनी केली .;

Leave A Reply

Your email address will not be published.