विवेक तोटेवार, वणी: पाटाळ्याच्या पुलावरून एका तरुणाने उडी घेतली. आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उघडकीस आली. उडी घेणा-या तरुणाचे नाव प्रणय संजय गोखरे (22) असे असून तो जैन ले आऊट येथील रहिवासी आहे. तो शिक्षण घेत आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास तो रागाच्या भरात घरून निघून गेला. त्याच्या कुटुंबीयांनी ही माहिती त्याच्या मित्रांना दिली. त्यामुळे त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार व शेजारी त्याचा शोध घेत होते. दरम्यान त्याचे मित्र पाटाळ्याच्या पुलाकडे गेले असता त्यांना तिथे प्रणयची दुचाकी उभी दिसली. संशय आल्याने त्यांनी महामार्गावरील सीसीटीव्ही चेक केले असता 10 वाजून 1 मिनिटांनी प्रणय पुलावरून उडी घेताना दिसला. सदर माहिती तातडीने वणी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गोपाळ उंबरकर यांनी सहका-यांसह तातडीने घटनास्थळ गाठले. सध्या बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली आहे. प्रणय हा एमबीए करीत असल्याची माहिती आहे. (अखेर तिस-या दिवशी तरुणाचा मृतदेह आढळला.)
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.


Comments are closed.