वणीत 7 सप्टेंबरला भव्य शेतकरी परिषद; शेतक-यांचा लढा

किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी हक्कांसाठी संघर्षाची सुरुवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे रविवारी दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदिर येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षिरसागर (परभणी), प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर), शेतकरी नेते कॉ. तुकाराम भस्मे (अमरावती), राज्याध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी (धुळे), राज्यसचिव कॉ. अशोक सोनारकर (अमरावती) आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेनुसार सर्व शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा. कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी द्यावी. आयात-निर्यात धोरण शेतकरी हिताच्या दृष्टीने ठरवावे. पीक विमा कंपनी सरकारी असावी आणि नियम स्थानिक नैसर्गिक परिस्थितीनुसार ठरवावेत. सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करावीत, खुल्या बाजारातील लूट रोखावी. जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देणारा कायदा करावा. इत्यादी मागण्या या परिषदेतून मांडण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही परिषद फक्त मागण्यांची यादी नसून, शेतकरी हक्कांसाठी ठाम संघर्षाची सुरुवात आहे. प्रगतिशील, लढाऊ आणि पुरोगामी विचारसरणीच्या शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावून चळवळ मजबूत करावी, असे आवाहन यवतमाळ जिल्हा कौन्सिलतर्फे कॉम. अनिल हेपट, अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, गणेश कळसकर, बंडु गोलर, वासुदेव गोहणे, रवि गोरे, गणेश शिटलवार, पंढरी मोहीतकर, पांडुरंग ठावरी, राकेश खामणकर, अथर्व निवडींग, छाया गावंडे, सुरेखा हेपट, प्रा. धनंजय आंबटकर, गुलाबराव उमरतकर, दीपक माहुरे, दिवाकर नागपुरे, संजय भालेराव, प्रा. प्रविण बंसोड, विजय ठाकरे, ऋषी उलमाले, दिलीप महाजन, अॅड. अरुण जवके, अमोल गौरशेट्टीवार, पी.जी. गावंडे, प्रदीप नगराळे, लक्ष्मणराव खंडारे यांनी केले आहे.

Comments are closed.