तहसिल कार्यालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या ?

0

मारेगाव: मारेगाव येथील हॉटेल व्यवसायी दिनेश मेहता यांचे वडील नारायण हरिराम मेहता (८५) यांनी पहाटे तहसिल कार्यालय परिसरात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

येथील तहसिल कार्यालया जवळील हॉटेल व्यवसायी दिनेश मेहता यांचे वडील नारायण हरिराम मेहता हे मुळव्याध आजाराने त्रस्त होते. त्रास असहाय्य होत असल्याने त्यांनी तहसिल कार्यालयातील पळसाच्या झाडाला सोमवारी पहाटे लुंगीच्या कापडाने गळफास घेउन आत्महत्या केली. सकाळी ही बाब उघडकीस येताच एकच खळबळ उडाली.

या घटनेची माहिती लगेच मेहता कुटुंबियांना दिली गेली. या घटनेचा तपास ठाणेदार अमोल माळवे यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. सध्या आजारपणाला त्रस्त झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा कसाय बांधला जातोय.

Leave A Reply

Your email address will not be published.