छोरीया ले आऊट मारहाणीत आता तक्रारदारावरही गुन्हा दाखल

दांड्याने एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप, बच्चे कंपनीचा वाद मारहाणीपर्यंत

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील छोरिया ले-आऊट परिसरात लहान मुलांच्या किरकोळ वादातून मध्यस्थी करणा-याला मारहाण करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कॉलोनीतील दोघांसह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी आता तक्रारदारावरही दारूच्या नशेत एका महिलेवर लाकडी दांड्याने हल्ला करून जखमी केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी परस्पर विराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, फिर्यादी निलीमा प्रभुज्योत उमरे (41, रा. छोरिया ले-आऊट, वणी) या छोरीया ले आऊट येथील एका अपार्टमेंट येथील रहिवासी आहे. त्यांच्या शेजारी असलेल्या आमेर टॉवर 3 येथे आरोपी राहतो. तो एमएसईबी येथे कर्मचारी आहे. गुरुवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी कॉलनीतील लहान मुलांचा आपसात वाद झाला होता. हा वाद वाढत त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचला. दुस-या दिवशी शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास हा वाद मिटवण्यासाठी सर्व पालक व मुलं परिसरात गोळा झाले होते. हा वाद मिटवणे सुरु होते. 

दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास आरोपी तिथे दुचाकीने आला. नागरिकांना शिवीगाळ करत वाद घालू लागला. यावेळी तो दारुच्या नशेत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. फिर्यादींच्या पतीने व त्यांच्या एका शेजा-याने या वादात तुमचा मुलगा नाही असे आरोपीला समजावून सांगितले. दरम्यान या वाद वाढत गेला व आरोपी अधिक संतापला. त्याने त्याच्या मोटरसायकलला लावलेला एमएसईबीचा दंडा काढून उपस्थितांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यातील एक वार निलीमा यांच्यावर डोक्याला लागला. यात त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली व त्या जखमी झाल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जखमी निलीमा उमरे यांना तातडीने एका खासगी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. आरंभी तब्येत बरी नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. मात्र दुस-या दिवशी त्यांनी वणी पोलीस ठाण्यात हजेरी लावून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपीवर बीएनएसच्या कलम 118(1),351(2),351(3),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या तक्रारीच्या आधी आरोपीने मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी कॉलोनीतील 2 आरोपी व एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला होता. 

भांडण सोडवणे पडले महागात, दांड्याने एकाला मारहाण 

Comments are closed.