स्वर्णपुष्पा फिल्म्सतर्फे अभिनय, नृत्य, गायन व भाषण कार्यशाळा
रविवार पासून सुरुवात, शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचीही संधी
बहुगुणी डेस्क, वणी: कलाक्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी स्वर्णपुष्पा फिल्म्सतर्फे उन्हाळी भाषण प्रशिक्षण, चित्रपट अभिनय, नृत्य व गायन कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दि. 10 मे ते 25 मे दरम्यान वणी येथे पार पडणार आहे. या कार्यशाळेत अभिनय, भाषणकला, नृत्य, गायन यांसोबतच यूट्यूब चॅनेल क्रिएशन, रिल्स बनविणे व एडिटिंगचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कार्यशाळेच्या तीन स्वतंत्र बॅच ठेवण्यात आल्या आहेत. सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 (स्पेशल लेडीज बॅच) आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत वर्ग होणार आहेत. नृत्य प्रशिक्षणासाठी विकास घाटोळे, तर गायन प्रशिक्षणासाठी रेश्मा दोडेवार मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे शुल्क 1200 रुपये निश्चित करण्यात आले असून सहभागी विद्यार्थ्यांना शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.
ही कार्यशाळा यशोधाम निवास, जुने MSEB ऑफिस, चिखलगाव रोड, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 8668919379, 9422559237 किंवा 7020909379 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments are closed.