मारेगाव: येथील नगरपंचायत प्रांगणात दि. ८ एप्रिलपासुन सुरु झालेल्या भागवत सप्ताहाचा मंडप गुरवारी रात्री १२.३० वाजता आलेल्या वादळात जमीनदोस्त झाला. त्यामुळेअखंड सुरु असलेल्या भागवत सप्ताह मंडप उभारणी पर्यंत थांबवण्यात आला आहे. मंडप कोसळल्याने मंडप डेकोरेशन व्यावसायिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
मारेगाव येथे गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वादळीवार्यासह पावसाची शक्यता वर्तवीली होती. त्याच कालावधीत तेथे नगरपंचायत जवळ भागवत सप्ताहाचा कार्यक्रम गावकऱ्यांनी आयोजीत केला आहे. तीन दिवस भागवत व्यवस्थित पार पडले, मात्र गुरुवारच्या रात्री वादळाने उग्र रुप धारण केले. त्यामुळे भागवत कार्यक्रमाचा संपूर्ण मंडप जमीनदोस्त झाल्याने कार्यक्रमात व्यत्यय आला आहे.
मंडप कोसळल्याने भागवत श्रवण करणारी मंडळी नाराज झाली असून निसर्गाच्या प्रकोपात मंडप डेकोरेशन वाल्याचे हजारोचे नुकसान झाले. सध्या नवीन मंडप उभारणी पर्यंत भागवत सप्ताह थांबविण्यात आला आहे.