मारेगाव-झरीत रक्तदानाचा महायज्ञ; 22 जुलैला भव्य शिबिर

बदकी भवन मारेगाव व भाजप कार्यालय झरी येथे आयोजन

बहुगुणी डेस्क वणी: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी मारेगाव व झरी तालुक्यात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी व़णीत देखील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर होत आहे.

मारेगाव तालुक्यातील रक्तदान शिबिर बदकी भवन, मारेगाव, तर झरी तालुक्यातील शिबिर भाजप कार्यालय, झरी येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे. या उपक्रमात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतः रक्तदान करण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक आणि सहकाऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असेही आयोजकांनी नमूद केले आहे.

शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे. या सामाजिक अभियानाला नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन रक्तदानाचा संदेश अधिक व्यापक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
मारेगाव : प्रशांत नांदे – मो. 90280 95997
झरी : राजू ताडूरवार – मो. 88882 76799

Comments are closed.