जन्माष्टमी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा ॲड. कुणाल चोरडिया

समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, रंगणार तीन दिवसीय भव्य महोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. 22 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात पार पडली. निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास व्यक्त करत त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्षांच्या अनुमतीने समितीची नूतन कार्यकारिणी व वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली. यामध्ये शुभम मदान, श्याम लाहारिया, राहुल मुंजेकर, अभय नागतुरे, उमेश पोद्दार, सुधीर तलसे, जयंत पांडे, राजू रिंगोले, अमोल धानोरकर, आशिष सिसोदिया, दीपक पाऊणकर, पार्थ त्रिवेदी आणि सौरभ राजुरकर यांचा समावेश आहे.

सल्लागार समितीत विजय चोरडिया, आशिष गुप्ता, निकेत गुप्ता, विजय पुण्यानी, दिवान फेरवानी, मूलचंद जोशी, राजाभाऊ बिलोरिया, महावीर कटारिया, नारायण गोडे, सुरेश मांडवकर, संतोष मार्कंडे, अनिल रेभे, विशाल दूधबडे, गजानन बत्तुलवार, पिंकी बत्रा, प्रा. दिलीप अलोणे आणि मयूर गेडाम यांचा समावेश करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तीन दिवसीय जन्माष्टमी महोत्सवाचे नियोजन
बैठकीत आगामी त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सवासाठी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह भव्य रॅलीचे आयोजन निश्चित करण्यात आले. विविध उपसमित्यांची घोषणा करून महोत्सवाचे चोख नियोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘भव्य नृत्य स्पर्धा’ महिला समितीच्या वतीने आयोजित होणार आहे.

बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विशाल दूधबडे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments are closed.