विषारी औषध प्राशन करून इसमाची आत्महत्या
राहत्या घरी विषारी औषध प्राशन, उपचारादरम्यान मृत्यू
पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील शिरपूर येथे एका 44 वर्षीय इसमाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. रविंद्र लक्ष्मण मोहर्ले (वय 44) असे मृत इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र मोहर्ले यांनी 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल केले.
दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असताना मध्यरात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रविंद्र मोहर्ले यांच्या नावावर सामायिक मौजा शिरपूर येथे शेतजमीन असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा आणि 1 मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शिरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Comments are closed.