वणी व राजूर येथे अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई
ड्राय डेला करत होते दारूची विक्री
वणी/विवेक तोटेवार: पोलिसांनी शनिवारी दुपारी चार ठिकाणी अवधै दारू विक्रेत्यांवर धाडी टाकल्या. जामध्ये 4 आरोपींना अवैधरित्या दारू विक्री करताना पकडले आहे. त्यातील एक आरोपी हा राजूरचा तर इतर तीन जण वणीचे आहेत.
राजूर येथे विक्की राहुल साव वय 28 वर्ष याच्या घरी दारू साठवून असल्याची खबर स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळ यांना मिळाली. त्यांनी त्वरित राजूर गाठून आरोपी विक्कीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात त्याच्या घरासमोरील खोलीत 180 एम एल क्षमतेचे 7 पेट्या अधलीन आल्या. सादर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पतंगे ,डोंगरे व सिरसाट यांनी केली.
यानंतर वणीच्या डी बी पथकाने पिंटू दुर्गेश रामगीरवार (30) राहणार गायकवाड फैल वणी याच्याकडून अवैद्य दारू विक्री करीत असताना 2475 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. दामले फैलातून श्याम संभाजी दुर्गे (30) याच्या घरातून एकूण 4350 रुपयाची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. यानंतर रंगनाथ नगर येथून ईश्वर दशरथ देठे (21) याच्याकडून 2400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाने केली. सदर चारही आरोपीवर कलम 65(इ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.