विवेक तोटेवार, वणी: जम्मू-काश्मिरात आठवर्षीय चिमुरडीच्या बलात्कारानंतर नराधमांनी निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ वणी शहरात कँडल मार्च काढण्यात आला. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आसिफाला न्याय मिळवून देण्यासाठी वणीकर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले. संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास वणीतील शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळून या मार्चला सुरूवात झाली. या कँडल मार्चमध्ये युवक, युवती, विद्यार्थी विद्यार्थीनीसह, चिमुरड्या बालिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. नराधमांना फाशी झाली पाहिजे, ‘जस्टिस फॉर असिफा’, ‘वूई वॉण्ट जस्टिस’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
सायंकाळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा कँडल मार्च काढला. ‘इन्साफ दो, इन्साफ दो, असिफा को इन्साफ दो’, ‘जस्टिस फॉर असिफा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी लोकांच्या हातात ‘जस्टीस फॉर चाईल्ड गर्ल’ , ‘असिफ को न्याय दो’ ,बलात्कारियो को फासी दो’ , ‘बलात्कारीयो का समर्थन करणे वाले मुर्दाबाद’ असे फलक होते. मोर्चेकरी ‘वुई वॉन्ट जस्टीस’ अशा घोषणाबाजी करीत होते. यावेळी राजा पाथ्रटकर, अखिल सातोकर, सिध्दिक रंगरेज, रुद्रा कुचनकर यांनी मोर्चाला संबोधले.
हा मार्च पाण्याच्या टाकीपासून सायंकाळी पावणे सात वाजता काढण्यात आला. सदर मार्च टिळक चौक, खाती चौक, कन्नमवार चौक, भारत माता चौक, दीपक चौपाटी, भगतसिंग चौक, गाडगे बाबा चौक, गांधी चौक, जटाशांकर चौकातून वळून आंबेडकर चौक असा मार्गक्रमन करत गेला. जसजसा मार्च चौकाचौकातून पुढे जात होता तसेतसे लोक मार्चमध्ये सामील झाले. मार्चचा शेवट टिळक चौकात इथे झाला. या मार्चमध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा सहभाग होताा.
समारोपीय ठिकाणी तीन मुलींनी झालेल्या घटनेबाबत आपले विचार मांडले. फौजिया खान यांनी महिलांवर कधीपर्यंत हा अत्याचार होत राहणार? असा सवाल उपस्थित करत त्यापेक्षा मुलगी झाली तर तिला लहानपणीच जमिनीत पुरून टाका ज्यामुळे असे गंभीर प्रकार होणार नाही अशी उद्वीग्नता व्यक्त केली. श्वेता आणि छबू ऊईके हिनेही आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
या कँडल मार्चमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे, प्रहार संघटना ,कांग्रेस, भारिप, संभाजी ब्रिगेड, मुस्लिम परिषद, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, महिलांसाठी कार्य करणाऱ्या विविध महिला संघटना, वकिलांची संघटना, विविध सामाजिक संघटना आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते. सदर कँडल मार्च मध्ये सत्ताधारी भाजपचे कुणीही नेते यात शामिल झाले नव्हते. एकही भाजपचा कार्यकर्ता किंवा नेता या मार्चमध्ये शामिल झाला नव्हता. यावरून सत्ताधारी बलात्काऱ्यांचे समर्थन तर करी नाही ना ? असा सूर जनतेतून निघत होता.
लिंकवर क्लिक करून पाहा कँडल मार्चचा व्हिडीओ…