झरी तालुक्यात खुलेआम गुटखा व सिलेंडर गॅसची विक्री

तेलंगना (आदिलाबाद) येथून तालुक्यात सप्लाय

0

सुशील ओझा, झरी: शासनाने गुटख्यावर बंदी आणली आहे. परंतु तालुक्यात सर्वत्रच खुलेआम गुटख्याची विक्री सुरू आहे. तालुक्यात लहान मोठे शेकडो पानटपरी चालक आहे. प्रत्येक टपरीवर गुटखा असल्याशिवाय धंदा करने कठिण झाले आहे. हा गुटखा तेलंगान्यातील अदिलाबाद इथून झरी तालुक्यात पोहोचत आहे. तर तालुक्यात मोठ्या प्रमाणात विना पावतीच्या सिलेंडरची विक्री देखील सुरू आहे.

पाटण, मांगली व मुकुटबन येथील काही किराना दुकानदारानी तेलंगाना येथील आदिलाबाद येथून सुगंधी गुटखा आणून विक्री करणे सुरू आहे. मात्र याकडे खाद्य व औषधी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तालुक्यात 6 दुकानदार सदर सुगंधित गुटखा आणून विकण्यात आघाडीवर आहे. प्रत्येक पानटपरी चालक यांचे ग्राहक असून त्यांच्या टपरीवर हा गुटखा त्यांना दिला जातो. कागदामध्ये गुटख्याची पुडी गुंडाळून ही विक्री सुरू आहे. गुटखा विक्री करणा-या दुकानदारांचे संबंधीत विभागासोबत समंध मधूर तर नाही ना व त्यामुळेच यावर कार्यवाही होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुक्यात चहा कॅण्टीन, हॉटेल, ढाबा, रेस्टारेंट व इतर ठिकाणी अधिकृत गॅस सिलेंडर कनेक्शन नसल्याने बिना पावतीचे अवैधरित्या गॅस सिलेंडरचा वापर सुरु आहे. सदर व्यावसाईकांना दुसऱ्यांच्या नावाने बोगस पावत्याच्या आधारे गॅस सिलेंडर बोलावून 1 हजार ते 1800 रुपयांपर्यंत गॅसची विक्री करीत आहे. तालुक्यातील मुकुटबन, पाटन, व झरी येथे गॅस सिलेंडर एजन्सी असून याच गावातुन मोठ्या प्रमाणात अवैध गॅस विक्री सुरु आहे. विशेष म्हणजे अवैध गॅस सिलेंडरची विक्री करणारे घरातच गॅस सिलेंडर ठेवतात. त्यामुळे याचा स्फोट झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित होत आहे. या अवैध प्रकाराकडे संबंधीत विभागाने लक्ष घालावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.