सेवानिवृत्त शिक्षक विनोद गोडे यांचा ग्रामवासीयांकडून सत्कार

0

सुशील ओझा, झरी: पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळा गणेशपूर (जुना) येथे कार्यरत असलेले शिक्षक विनोद गोडे ३० एप्रिल रोजी निवृत्त झाले. यानिमित्त ग्रामवासियानी गोडे यांचा सत्कार केला. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजुदास जाधव होते. तर प्रमुख पाहुणे सरपंच रत्नमाला संतोष बरडे, चक्रधर तिर्थगिरीकर अध्यक्ष खरेदी विक्री संघ, प्रकाश दिकोंडवार केंद्रप्रमुख, संतोष बरडे, बापूराव जिनावर, शृंगारे, आसुटकरसह इतर मंडळी उपस्थित होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

कार्यक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले, स्वागत समारंभात निवृत्त शिक्षक विनोद गोडे व त्यांच्या पत्नीसह सत्कार करण्यात आला. विनोद गोडे हे आपल्या शिक्षकी कारकिर्दीत शिक्षणाबाबत विद्यार्थासह पालकांच्या मनात घर करून गेले, तसेच शिक्षक संघटनेत जिल्हासचिव पदावर राहून जिल्ह्यातील शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याकरिता धडपड करणे, तसेच स्वतःच्या करकीर्दीत एकाही पालकांची किंवा विद्यार्थ्यांची तक्रार नाही हे विशेष. स्वागत समारंभात शिक्षक व गावकऱ्यांची भाषणे झाली, त्यात गोडे यांनी केलेल्या कार्य व उपक्रमाविषयी सांगण्यात आले, त्यांच्या कार्याचे कौतुक करून पुढच्या वाटचालीचा शुभेच्छा देण्यात आल्यात. संचालन ढेंगळे यांनी केले,

Leave A Reply

Your email address will not be published.