कारेगाव(परंबा) येथील वनव्यवस्थापन समिती प्रथम पुरस्काराने सन्मानित

संत तुकाराम महाराज योजनेचा जिल्हास्तरीय पुरस्कार

0

सुशील ओझा, झरीः वन संपदेने नटलेल्या या तालुक्यातील कारेगाव ( पारंबा) येथील वनव्यवस्थापन समितीस सन 2017 -18 या वर्षाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पालकमंत्री मदान येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश लक्ष्मण धुर्वे यांनी पुरस्काराचा 51 हजार रुपये रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र स्वीकारले.

सन 2017-18 या कालावधीत कारेगाव वनव्यवस्थापन समितीच्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रामुख्याने उपस्थित होते. झरी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारेगाव(परंबा)या गावास संत तुकाराम योजने अंतर्गत 2017-18 या वर्षात वनरक्षण संवर्धन रोपवन कामे उत्कृष्ट काम केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातून संयुक्त वनव्यवस्थापन समिती कारेगावची निवड करण्यात आली होती.

या समितीने वनांचे संरक्षण, श्रमदानातून वनराई बंधारा तयार करणे, बी लागवट करणे, जलसंधारण कामे करणे, कुऱ्हाड बंदी, चराई बंदी, ग्रामस्वच्छता करणे अशा प्रकारचे निकष पूर्ण करून या समितीने तुकाराम वनग्राम योजनेमध्ये भाग घेतला. त्याचे तालुकास्तरीय मूल्यमापन होऊन जिल्हास्तरीय निवडसमितीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, पांढरकवडा, यवतमाळ, अकोला, या वनविभामार्फत विविध वनव्यवस्थापन समितीने भाग घेतला. निवड समितीने याचे मूल्यमापन केले. पांढरकवडा वनविभागातील जामनी वनपरिक्षेत्रातील कारेगाव (परंबा) या समितीस जिल्यास्तरीय प्रथम पुरस्कार 1 मे महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून देण्यात आला. यावेळी के. एम. अभणा उपवनसंरक्षक पांढरकवडा वन विभागाचे व्ही. पी. वसव (थिगळे) सहाय्यक वनसंरक्षण, एस .बी. मेहे तर वन परीक्षेत्राधिकरी व समितीचे सचिव डी.सी.लोखंडे यांच्या मार्गदर्शनात कामे करण्यात आलीत. वनरक्षक ए व्ही राठोड वनविभागाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रथम पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.