मोफत कराटे प्रशिक्षणात १००च्या जवळपास मुलींची नोंदणी

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी खास आयोजन

0

संतोष गोमकर, वणीः महिलांनी सर्वच क्षेत्रांत स्वावलंबी झाले पाहिजे. आत्मरक्षणाची नवनवी साधने स्त्रियांनी आत्मसात केली पाहिजेत. यासाठीच राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण येथील आदर्श हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संगिता अशोक खटोड आणि विजयालक्ष्मी आगबत्तलवार यांच्या मार्गदर्शनात शनिवार दि. 19 मे ते 10 जून 2018 या कालावधीत स्थानिक आदर्श हायस्ूकल येथे सायंकाळी 5 ते 7 दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर होईल. 6 ते 40 वर्षे वयोगटांतील जवळपास 100 महिलांनी या शिबिरासाठी नोंदणी केली आहे.

नेस्कीन मंक्स कंुग फू ब्लॅक बेल्ट होल्डर कैलाश बिडकर हे कराटेचे प्रशिक्षण देतील. यावेळी प्रशिक्षक बिडकर व काही शिबिरार्थ्यांनी या शिबिराबद्दल माहिती दिली. डॉ. महेंद्र लोढा यांनी या शिबिराचे महत्त्व सांगितले. अशा शिबिराची सर्वच ठिकाणी आवश्यकता त्यांनी सांगितली. आजचं युग हे मुलींचंच आहे. त्यांना सर्वच क्षेत्रातील यशांसाठी सर्वोतोपरी प्रयत्न ते करणार असल्याचेही म्हणाले. या प्रशिक्षणाच्या सविस्तर माहितीकरिता 7522990499 आणि 9923255825 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती करण्यात येत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.