अडेगाव येथे नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर  

0

सुशील ओझा, झरी: समाजसेवा हीच ईश्वरसेवा ह्या उक्तीप्रमाणे कार्य करत समता फाऊंडेशन, मुंबई तथा महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या विद्यमाने व रक्तदान महादान फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर झाले. रक्तदान महादान फौंडेशनचे अध्यक्ष मंगेश पाचभाई व मित्र परीवार तर्फे आयोजित दि २३ मे  ला सकाळी १० वाजता  दत्त मंदिर अडेगाव  येथे आयोजन करण्यात आले होते.

 

या शिबिरात गावातील १०० महिलां व पुरुष रुग्णांची नेत्रतपासणी झाली. नंतर त्यांना नागपूर येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या शिबिराला गुरुदेव सेवा प्रचारक जनार्धन मोहितकर,लटारी पारखी,बंडू उरकुडे,चंद्रकांत पानघाटे,दिगंबर पाचभाई,राहुल ठाकूर,बंडू घाटे,सुशील खुसपुरे,गणेश पेटकर,आकाश गोचे व समस्त ग्रामस्थांनी सहकार्य केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.