पोहणा-राजूर (कॉलरी) रस्त्याचे भूमीपूजन

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामाला सुरूवात

0

विवेक तोटवार, वणी: नांदेपेरा पोहणा-राजूर (कॉलरी) हा पांदण रस्ता वर्षानुवर्षांपासून दुर्लक्षीत होता. आठवडी बाजार, तथा उदरनिर्वाहासाठी स्थानिक रहिवाशांना जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुर्दशा व्हायची. या रस्त्यावर टोंगळ्यापर्यंत चिखल साचायचे. त्यामुळे चिखल तुडवत जाण्यापासून गावक-यांकडे दुसरा मार्ग नव्हता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटनीस डॉ. महेंद्र लोढा यांच्याजवळ गावक-यांनी त्यांची समस्या बोलवून दाखवली. 30 मे रोजी सकाळी या पांदण रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. श्रमदानातून आणि डॉ. लोढा यांच्या सहकार्यातून हा रस्त्या तयार करणे सुरू आहे.

सकाळी 9 वाजता या रस्त्याचे भूमीपूजन करण्यात आले. गावाला रस्ता मिळणार म्हणून श्रमदानासाठी यावेळी शेकडो लोक गोळा झाले होते. डॉ. लोढा यांनी स्वतः श्रमदानात सहभाग घेऊन गावक-यांच्या खांद्याला खांदा लावत श्रमदान केले. येत्या 36 तासांमध्ये हा रस्ता पूर्ण होईल अशी आशा यावेळी डॉ. लोढा यांनी वणी बहुगुणीशी बोलताना व्यक्त केली.

यावेळी दिलिप पेचे, रवि जयस्वाल, विलास चिकटे, विठ्ठल पाटील पेचे, इंदुताई पेचे, ललिता पेचे (माजी सरपंच), कल्पना घोडाम (उपसरपंच), आशिष चाहनकर, सुनील पेचे, धीरज पेचे, रवि वनकर, अनिल घोडाम, प्रशांत बांदेकर, रविदास केळकर, सारंग पेचे आणि समस्त गावकरी उपस्थित होते.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.