12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल व प्रत

राष्ट्रवादी काँग्रेसचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: दिनांक 30 मे बुधवारी 12 वीचा निकाल लागणार आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वणी आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी मोफत निकाल आणि मार्कसिटची सुविधा दिली जाणार आहे. दुपारी 1 ते रात्री 8 पर्यंत याा सुविधेचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. वणी बसस्थानक समोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार असून निकाल बघितल्यानंतर लगेच त्यांना मार्कसिटची प्रिंट काढून दिली जाणार आहे.

ही सुविधा बुधवारी आणि गुरुवारी सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटनिस डॉ. महेंद्र लोढा, सूर्यकांत खाडे, राजाभाऊ बिलोरिया, सोनू निमसटकर, संजय पेचे, स्वप्निल धुर्वे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.