बोगस अर्जनवीसची होणार हकालपट्टी

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील तहसिल कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या बोगस अर्जनविसांची हकालपट्टी होणार आहे, प्रभारी तहसिलदार यांनी ही माहिती दिली आहे. झरी तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात आदीवासी निरक्षर व अज्ञानी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून झरी येथील शासकीय कामानिमित्त तालुक्यातील जनतेला पंचायत समिती, कृषी कार्यालय, बँक, भूमिअभिलेख, शिक्षण विभाग, व इतर कार्यालयासह तहसील कार्यालयात यावे लागते. अज्ञान व निरक्षर असल्याने जनतेला कोणताही अर्जा करिता तहसील कार्यालयातील आवारात ठिय्या मांडून बसलेल्या बोगस व तोतया अर्जनविस कडे जातात.

प्रतिज्ञा पत्र, शासकीय अर्ज व इतर  कागद काळे करून घेतात.व त्या कामाचे अर्जनविसकडून मोठी रक्कम उकळले जात आहे. नियमाने अधिकृत अर्जनविस याना रोजचा रेकोर्ड ठेवावा लागतो . परंतु एक पेन घेऊन येणाऱ्या बोगस व तोतया अर्जनविस जवळ कुठचा रेकोर्ड राहणार असेही सुज्ञ जनता बोलत आहे. गरीब जनतेचा अज्ञानाचा फायदा घेत २० व ३० रुपयाच्या कामाचे १५० ते २०० रुपये उकळून जनतेची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात करीत असल्याचे  वणी बहुगुणीने केला . ह्या बोगस अर्जनविस वर कार्यवाही कोण करेल असा प्रश्न उपस्थित  होत होता. तहसील कार्यालयाच्या परिसरात ८ ते १० बोगस अर्जनवीस टेबल खुर्च्या व म्याट टाकून असे  बसतात जसे की मोठी डिग्री प्राप्त आहे . सदर बोगस व तोतया अर्जनविस तर प्रतिज्ञापत्रावर  सत्यकथन लिहायला सुद्धा मागेपुढे पाहत नाही. स्वतःच अस्त्याच्या मार्गाचा वापर करून लोकांची सत्यकथन लिहतात ज्यामुळे शासन किती जागृत आहे हे दिसून पडले. तहसील कार्यालयातिल एक अर्जनविस वगळता एकाही अर्जनविसंकडे परवाना नाही ज्यामुळे यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय असो की निमशासकीय कागद लिहण्याचे अधिकार नसताना हे बोगस अर्जनविस सर्रास जनतेकडून अव्वा च्या सव्वा घेऊन जनतेला लुटून गबर बनत आहे व यांच्या लिहिलेल्या कागदावर संपूर्ण शासकीय अधिकारी ही शहानिशा न करता बिनधास्त सह्या करतांना दिसतात.

नियमाने बोगस अर्जनविस वर  फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे प्रावधान असतांना सुद्धा कार्यवाही होत नाही . बोगस अर्जनविस  मोठ्या उजगिरीने कुणाला न भिता आजही कागदे लिहीत आहे . महसूल विभाग त्यांच्यावर मेहरबान दिसत आहे.याबाबत वणी बहुगुणीने पाठपुरावा केला ज्यामुळे शासनाला जाग आली असून बोगस अर्जनविसची तहसील कार्यालयाच्या बाहेर हकालपट्टी करणार असल्याचे प्रभारी तहसीलदार खिरेकर यांनी सांगितले परंतु सदर बोगस अर्जनविस यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल करावे अशीही संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.